इंडियन आयडॉल’ फेम पवनदीप राजनचा भीषण अपघात   

गायकाला गंभीर दुखापत

मुंबई : ‘इंडियन आयडॉल’ या प्रसिद्ध गाण्याच्या कार्यक्रमातून सर्वांची मने जिंकणाऱ्या गायक पवनदीप राजनचा आज सोमवारी पाहाटे कार अपघात झाला. पहाटे ३:४० या वेळेदरम्यान हा अपघात झाला. या अपघातात पवनदीप गंभीर जखमी झाला आहे. 
 
समोरआलेल्या एका व्हिडीओमध्ये पवनदीपला मोठी दुखापत झाल्याचे दिसते.मिळालेल्या माहितीनुसार अहमदाबाद येथे हा अपघात झाला. अपघातात पवनदीपच्या डाव्या पायाला आणि उजव्या हाताला दुखापत झाल्याचे समजते. अद्याप याबद्दलची सविस्तर माहिती समोर आलेली नाही.पवनदीपच्या चाहत्यांसाठी हे खूप वाईट बातमी आहे. समाजमाध्यमांवर शेअर केलेल्या व्हिडिओ खाली चाहत्यांनी त्याला लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना केली आहे. पवनदीप राजन ‘इंडियन आयडॉल’ सिजन १२ चा विजेता ठरला होता. या कार्यक्रमादरम्यान पवनदीपने विविध गायकांची प्रसिद्ध गाणी गात परीक्षकांची व चाहत्यांची मनं जिंकली, त्यामुळे आज त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. 

Related Articles